पंढरपूर/प्रतिनिधी;
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मंदिर समितीने मान्य केले आहेत. विठ्ठल मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडे 2017 पासून प्रलंबित मागण्या होत्या. विठ्ठल मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचा लाभ मिळत नव्हता. कर्मचार्यांच्या मागण्या विठ्ठल मंदिर समितीने एक मुखाने निर्णय घेतल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कर्मचारी विजय घोडके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुले करण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली आहे त्यामुळे विठ्ठल मंदिर समितीच्या सदस्यांची बैठक आज भक्तनवास येथे घेण्यात आली यावेळी 2017 पासून प्रलंबित असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या कर्मचाऱ्यांच्या मागण्या समितीपुढे मांडण्यात आल्या त्यावर सर्व सदस्यांनी एक मत करत या मान्य मागणी करत असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित होत्या विठ्ठल मंदिर मध्ये जवळपास पावणेदोनशे कर्मचारी कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा इतर रजा तसेच पदी पदोन्नती यांसारख्या सुविधा कर्मचाऱ्यांना लागू नव्हत्या या सर्व मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेने विठ्ठल मंदिर समितीच्या सदस्यांकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला आज यश आल्याची माहिती कर्मचारी घोडके यांनी दिली आहे.
0 Comments