भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार बऱ्याच दिवसांपासून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी गेली ५ ते ६ वर्षांपासून हे दोघे काँग्रेसच्या संपर्कात होते.
मात्र त्यांनी कधी येण्याची भूमिका घेतली नाही पण आता त्यांनी काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे, असं सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस चढत्या क्रमांकावर नसून तर ती खाली खाली येत आहे. अशा वेळी जर ही मंडळी येत काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असंही सुशिलकुमार शिंदे म्हणाले. पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी ते आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदेंनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं आहे.
0 Comments