करमाळा! बलात्कारप्रकरणात मनोहर भोसलेला सात दिवसाची पोलिस कोठडी; सुमारे पाऊण तास चालला युक्तीवाद



करमाळा/प्रतिनिधी:

 तालुक्यातील उंदरगाव येथील अटकेत असलेल्या मनोहर भोसलेला करमाळा न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. भोसलेला बारामती पोलिसांकडून ताब्यात घेऊन बलात्काराच्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांनी रविवारी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी (ता. २०) भोसलेला न्यायालयात हजर केले होते. सुमारे पाऊणतास हा युक्तीवाद चालला.

करमाळा तालुक्यातील भोसलेवर बारामती व करमाळा पोलिसात गुरुवारी (ता. ९) एकाच दिवशी गुन्हा दाखल झाला होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी बारामती व करमाळा पोलिसांचे पथक भोसलेच्या मागावर होते.

दरम्यान बारामती पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर दोनवेळा भोसलेला बारामती न्यायालयाने पोलिस कोठडी दिली होती. रविवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर भोसलेला न्यायालयात हजर केले तेव्हा पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून भोसलेला करमाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन करमाळ्यात आणून अटक केली.

भोसलेला न्यायालयात आणले तेव्हा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. करमाळा पोलिस स्टेशन ते न्यायालय हे अंदाजे अर्धा किलोमीटर आहे. न्यायालय परिसर व पोलिस स्टेशन परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांच्यासमोर हजर केले होते. त्यांनी सात दिवसाची पोलिस कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. सचिन लुणावत यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व त्यांच्या सहकार्यांनी पावणे एक वाजताच्या सुमारास भोसलेला न्यायालयात आणले होते.

‘एका मालिकेत काम देतो असे सांगत पिडीतेवर अत्याचार केलेला आहे, असा भोसलेवर अरोप आहे. या गुन्हातील कपडे जप्त करणे, चिट्टी जप्त करणे आशा १७ कारणांचा दिली आहेत. त्याचा तपास करण्यासाठी १० दिवस तपास अधिकारी कोकणे यांनी पोलिस कोठडी मागितली होती. अॅड. लुणावत यांनी सरकारकडून बाजू मांडली. दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. तर भोसलेच्या वकीलांकडून न्यायालयीन कोठडी मागण्यात आली होती. अॅड. हेमंत नरुटे व अॅड. विजय गायकवाड यांनी संशयित आरोपीकडून बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments