मोहोळ/प्रतिनिधी :
मोहोळ तालुक्यातील अनगर-कोंबडवाडी, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी आणि कुरणवाडी या चार ग्रामपंचायतीचे रूपांतर अनगर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
अधिसूचना राज्य शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीत लेखी कारणे, आक्षेप जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करावेत, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
0 Comments