राजकारणाचे पहिले बाळकडू पंढरपूरने दिले आहे : आमदार शहाजीबापू पाटील



पंढरपूर/प्रतिनिधी;

स्व. औदुंबर आण्णा पाटील, स्व. यशवंत भाऊ, स्व. सुधाकरपंत परिचारक, स्व. वसंतदादा काळे, स्व. पुरवत भाऊ हे सर्व माझे दैवत आहेत. माझ्या राजकारणाची खरी सुरूवात पंढरपूरमधून झाली. येथेच मला पहिले राजकारणाचे बाळकडू मिळाले त्यामुळे तालुक्यातील जनतेची सेवा करण्यात मी कधीही कमी पडणार नाही असे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

उपरी येथे ग्रामपंचायत च्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन  आ.शहाजी बापू पाटील,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, युवक नेते प्रणव परिचारक, शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजीराजे शिंदे, जि. प. सदस्या शोभाताई वाघमोडे, तानाजी वागमोडे, राष्ट्रवादी व्यापार उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, वाडिकुरोलीचे सरपंच धनंजय काळे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
 
(Advertise)

यावेळी पुढे बोलताना आ.शहाजीबापू पाटील म्हणाले की, मी दहा वर्षांमध्ये उपरी गावासाठी काही देऊ शकलो नाही पण उपरी गावाने मला भरभरून दिले आता मात्र मी आमदार आहे त्यामुळे उपरी गावाला निधी कमी पडू दिला जाणार  नाही.कासाळगंगा ओढ्यावर ११ बंधारे बांधण्या साठी ११ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला असुन व कासाळ ओढ्यावर भाळवणी - गार्डी   येथे  ऐतिहासीक पुल होणार आहे. तो मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे असे आ. पाटील यांनी सांगितले.  

उपरी गावाला आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भरभरून निधी दिला आहे. त्या मध्ये राष्ट्रीय पेय जल मधून ४५ लाखाचा नळ पाणी पुरवठा साठी निधी, आत्तापर्यंत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत २६ लाखाचा निधी व ऑगस्ट महिन्यामध्ये १२ लाख ३५ हजाराचा निधी, स्मशानभूमी, दलित समाज मध्ये अंडरग्राउंड गटार, गावामध्ये काँक्रिटचे रस्ते ,हायमास्ट दिवे  यांच्यासह विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिल्याचे  तानाजी वाघमोडे यांनी सांगितले.

(Advertise)

या प्रसंगी नागेश फाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक पाडुरंग कारखान्याचे सिव्हील इंजी.हनुमंत नागणे यांनी तर माजी उपरपंच आण्णासाहेब नागणे यांनी आभार मानले. कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सरपंच ज्ञानेश्‍वर चव्हाण उपसरपंच महेश नागणे, सुरेशशेठ नागणे, शंकर सावंत,  निवास नागणे, अतुल नागणे, नितीन खाडे, पै. सतिश नागणे, सदस्या लक्ष्मीबाई कोळी यांच्याह   युवक मित्रांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास साहेबराव नागणे, सुभाष जगदाळे, चंद्रकांत जाधव, लेखाधिकारी राजाभाऊ नागणे, अरूण नागणे, रावसाहेब नागणे, प्रा. नवनाथ गव्हाणे, संजय जगदाळे, दत्तात्रय नागणे, बाळासाहेब नागणे, साहेबराव जगदाळे, बाळा नागणे, हणुमंत मोहिते, सुरेश जाधव, ग्रामसेवक  बालाजी येलेवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ  व तरूण उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा कासाळ ओढ्यात गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. विकास कामे करताना आ. शहाजीबापूनीं राजकारण केले नाही. त्यामुळे ते सर्वांचे जाण असणारे एकमेव आमदार आहे. उजनी कॅनलसाठी भूसंपादन झालेल्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा कारण इतर तालुक्यांना वेगळा दर मिळाला आहे. आ. बापुमुळे गटात विकासाची गंगा आली आहे.
- कल्याणराव काळे, चेअरमन सहकार शिरोमणी

गेल्याकाही वर्षांपासून ग्रामिण भागाचा मोठा विकास होत आहे. ४० वर्षांपासून आमच्या कुटूंबावर जनतेने प्रेम केले आहे. सर्वच पक्षात आ. शहाजीबापूंचे मोठे वजन असल्यामुळे गटात विकासाची गंगा आली आहे.
- प्रणव परिचारक, युवक नेते
भाळवणीमध्ये लवकरच  महाविकास   आघाडी सरकारच्या माध्यमातून ३० बेडचे हॉस्पिटल होणार आहे. लसिकरणात जिल्ह्यात गट एक नंबरवर आहे. विकास कामे करतांना आ. शहाजीबापू कुठेही राजकारण करीत नाहीत. त्यामुळे गटातील सर्व गावांना आज योग्य न्याय मिळत आहे.
- संभाजीराजे शिंदे, जिल्हाध्यक्ष शिवसेना

Post a Comment

0 Comments