मुंबईमध्ये एका नराधमाने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान त्याने अश्लील व्हिडीओ बनवला. त्यानंतर संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने पीडितेकडून साडेपाच लाखांची खंडणी मागितली. महिलेने पैसे दिले नाहीत म्हणून आरोपीने पीडित महिलेच्या पतीला संबंधित व्हिडीओ पाठवला.
पण महिलेच्या पतीने तिला साथ देण्याच्या ऐवजी तो महिलेकडून घटस्फोटाची मागणी करु लागला. “घटस्फोट दे नाहीतर बलात्काराचा अश्लील व्हिडीओ शेअर करेन”, अशी धमकी तो पीडिताला देऊ लागला. अखेर या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी पती महिलेला सारखा त्रास देत होता. तिने घटस्फोट द्यावा यासाठी तो पीडितेला मानसिक आणि शारीरिकरित्या छळत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तिने पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार केली.
या दरम्यान पीडित पत्नी पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती आरोपीला मिळाली. आपण पकडले जाऊ या विचाराने त्याने घरातून धूम ठोकली. तो त्याच्या उत्तर प्रदेशातील मूळगावी श्रावस्ती येथे पळाला. पण पोलिसांनी त्याला तिथे जाऊन बेड्या ठोकल्या.
आरोपी पतीला पकडल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. दुसरा आरोपी म्हणजे महिलेवर बलात्कार करणारा आणि त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून साडेपाच लाखांची मागणी करणारा. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत बलात्कार करणाऱ्या नराधमाला देखील बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार, खंडणी सारखे आणखी काही गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींनी मिळून काही कट आखला होता का, त्यांनी पीडितेला नेमकं का छळलं? या सगळ्यांचा तपास आता मुंबई पोलिसांकडून सुरु आहे.
0 Comments