कोल्हापुरात नराधमानं गाठला अमानुषतेचा कळस
लग्नाचं आमिष दाखवून सलग दोन वर्षे एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे. आरोपीनं केवळ हार घालून लग्न केल्याचं नाटक करत पीडित महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे.
तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं नेसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मारुती तातोबा तेऊरवाडकर असं गुन्हा दाखल झालेल्या २५ वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदवड तालुक्यातील कालकुंद्री येथील रहिवासी आहे. पीडित तरुणीनं तक्रार केल्यानंतर संशयित आरोपी मारुती तेऊरवाडकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपीनं ऑक्टोबर 2019 ते 28 जुलै 2021 पर्यंत पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. दरम्यान आरोपीनं दोनवेळा पीडितेचा गर्भपात घडवून तिला नरक यातना दिल्या आहे.
याशिवाय जेसीबी भाड्यानं घेतो असं सांगून आरोपीनं महिलेचे दागिने बँकेत गहाण ठेवून पीडितेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याचबरोबर आरोपीनं पीडितेला काही वेळा मारहाण केल्याचंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments