बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन ही जोडी बॉलिवूडमधल्या अतिशय लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून असल्यानं ऐश्वर्याचा दबदबाही काही वेगळाच आहे. बच्चन कुटुंबाबद्दल जनतेत प्रचंड आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला लोकांना प्रचंड आवडतं.
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनही सोशल मीडियावर सक्रिय असतात. २००७ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याला आराध्या नावाची एक मुलगी असून, तिच्यासह ऐश्वर्या आपले तसेच अभिषेकचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिषेकही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. दोघांचंही फॅन फॉलोइंग मोठं आहे. दोघांच्या प्रेमाचे, लग्नाचे किस्से आजही चर्चेत असतात.
‘गुरू’ या चित्रपटादरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात जवळीक निर्माण झाली. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या भेटी नंतरही वाढत राहिल्या आणि एक दिवस दोघांनीही एकमेकांना आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला. ‘गुरू’ चित्रपटाच्याच प्रमोशनसाठी जेव्हा दोघंही न्यूयॉर्कला गेले होते, तेव्हा अभिषेकनं ऐश्वर्याला प्रपोज केलं.
मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्यानं हा किस्सा सांगितला होता. ‘अभिषेक माझ्यासमोर गुडघे टेकून मला प्रपोज करत होता, तेव्हा मला एखाद्या हॉलिवूड चित्रपटातला सीन सुरू असल्यासारखं वाटत होतं. मी इतकी आनंदी झाले होते, की होकार द्यायला मी मुळीच वेळ घेतला नाही,’ असं तिनं सांगितलं होतं.
0 Comments