एका अभिनेत्रीने केलेल्या आवाहनाची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. यामागे कारण ही तसेच आहे. कारण या अभिनेत्रीने महिलांनी पुरुषांविरुद्ध ‘सेक्स बंद’ आंदोलन करायला हवं असं आवाहन केलं आहे. अभिनेत्री बेट्टी मिडलरने हे आवाहन केलं आहे. याबाबत मिडलरनने ट्विट केलं आहे.
बेट्टी मिडलर ही न्यूयाॅर्कमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या टेक्सास मध्ये १ सप्टेंबर पासून नवीन कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार गर्भवती असलेल्या महिलेला जर आपल्या गर्भातील बाळाच्या ह्रदयाचे ठोके ऐकू येत असतील तर गर्भपात करता येणार नाही.
या कायद्यानंतर टेक्सासमधील गर्भपात रुग्णालयांनी याला विरोध केला आहे. तसेच तिथल्या स्थानिक महिलांनी देखील या कायद्याला विरोध केला आहे. या कायद्यामुळेच बेट्टीने ट्विट केलं आहे. जोपर्यंत अमेरिकन काँग्रेस न्याय देत नाही तोपर्यंत महिलांनी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार द्यावा, असं बेट्टीने म्हटलं आहे.
कायद्यानंतर महिलांनी विरोध करुन याचिक देखील दाखल केली आहे. मात्र यावर निर्णय झाला नसून या प्रकरणाचा निकाल अद्याप लागला नाही.
0 Comments