बार्शी/प्रतिनिधी:
गेल्या चार दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील आगळगाव, मांडेगाव, बेलगाव, धस पिंपळगाव व खडकळगाव या गावांचा संपर्क बार्शी तुटलेला असून त्यामुळे जनजीवनही विस्कळित पणा आला असून वाहतूक ठप्प झाली आहे.
सतत पडत असलेल्या मुसळधार पाऊस यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, कांदा यासारख्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला उडीद पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला असून यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे.
शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही ग्रामस्थांतून होत आहे.
0 Comments