बार्शीत मंडळाच्या अध्यक्षासह २५ जणांवर गुन्हा दाखलबार्शी/प्रतिनिधी:

शहरातील भोसले चौक येथील जवाहर गणेश मंडळाने गर्दी करुन,फटाके उडवून वाढदिवस साजरा केला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत मंडळाच्या अध्यक्षासह २५ जणां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

(Advertise)

जवाहर गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रविण पवार(वय २५), चंद्रकांत पवार(दोघे रा.राऊत चाळ)यांचेसह २५ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.सहायक पोलिस फौजदार बाळासाहेब नाईकनवरे यांनी फिर्याद दाखल केली.ही घटना बुधवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान घडली. गणेश उत्सवानिमित्त पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांचेसह पोलिस पथक शहरातून गस्त घालीत असताना भोसले चौकात येताच तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली त्यावेळी मंडळासमोर वीस ते पंचेवीस जण उभे होते तेथे वाढदिवस कार्यक्रम सुरु होता.

गर्दीमध्ये कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लघन केले असे फिर्यादीत म्हटले आहे पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा,साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून तपास हवालदार माळी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments