“...म्हणून केंद्र सरकारने मला पुन्हा नजरकैदेत ठेवलंय"



केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केल्यानंतर केलं. त्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये अनेक घटना घडल्या. पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारने पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला आहे.

 बाहेर पडण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर आज पुन्हा माझ्या घरात बंद आहे. हे काश्मीरचे खरे चित्र आहे. भारत सरकारने स्वच्छ आणि ठरलेल्या पिकनिक दौऱ्यांऐवजी हे दाखवायला हवं, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. या अगोदर ७ सप्टेंबर रोजी देखील नजरकैदेत ठेवल्याचा दावा मुफ्ती यांनी केला होता.

जम्मू काश्मीरला घटनेतील ३७० व्या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर आता येत्या काळात जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments