बार्शीत अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


 बार्शी : विक्रांत सुधीर रसाळ यास मॉर्निगवॉकसाठी गेल्यानंतर जबरदस्तीने पळवून नेवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना सुभाषनगर भागात घडली आहे. याबाबत जखमीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविराधात गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रांत रसाळ कॅन्सर हॉस्पिटलजवळील वाणी प्लॉट मधील रहिवाशी आहेत. सुभाष नगर भागातील रिंगरोड येथील गारवा हॉटेल ते चालवितात.  ते दररोज पहाटे ५ च्या सुमारास घराजवळील रस्त्यावर फिरण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे ते पहाटे ०५/१५ वाजण्याचे सुमारास फिरण्याकरिता घराबाहेर पडले, परंतु नेहमीच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साठलेले असल्यामुळे ते मुख्य रस्त्यावर येवून सुभाषनगर कडे निघाले.

रस्त्यावरील गुळमिरे यांचे शाळेसमोर आले असता अचानक पाठीमागून पाच इसम आले. त्यांनी हात-पाय पकडून उचलून त्यांना रस्त्यापलीकडे सुमारे ४०० फूट अंतरावर असलेल्या बुटे यांच्या शेतात नेले. यावेळी त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने त्यांच्या तोंडात कुकरी घातली. तेथे त्यांना पालथे झोपवून दोन्ही हात व पाय दोरीने बांधले. त्यानंतर एक इसम तोंडावर बसला व दुसरा पायावर बसला. त्यातील एका इसमाने हातोड्यासारख्या हत्याराने त्यांच्या कंबरेवर मारणेस सुरवात केली. तेव्हा ओरडण्याचा प्रयत्न केला असता कापडी बोळा  तोंडात कोंबला.

Post a Comment

0 Comments