भारत देशाने ४ सुवर्णपदकासह एकूण १८ पदकं पटकावली. या पदकांमध्ये अजून एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. देशाला बॅडमिंटन या प्रकारात ५ व सुवर्ण पदक मिळालं आहे. या पदकासह देशाची एकूण पदक संख्या १९ झाली आहे.
भारतीय बॅडमिंटन खेळाडू कृष्णा नागरने ऐतिहासीक कामगिरी केली आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवून कृष्णाने देशाला सुवर्ण पदक पटकावून दिलं आहे. बॅडमिंटन या प्रकारात हाॅंगकाॅंगच्या खेळाडूला पराभूत करत कृष्णाने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.
अवघ्या वयाच्या दोन वर्षाचा असताना कृष्णाच्या पालकांना समजलं की कृष्णा इतर मुलांप्रमाणे नाही. त्यावेळी पासून सुरू झालेला संघर्षमय प्रवास आज सुवर्ण पदकापर्यंत येऊन पोहोचला आहे. कृष्णाने बॅडमिंटनच्या एसएच ६ या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहेे. कृष्णाने अंतीम सामना २१-१७, १६-२१, २१-१७ अशी कामगिरी करत जिंकला आहे. कृष्णा नागरने आज देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
0 Comments