बार्शी/प्रतिनिधी:
‘बिग बॉस मराठी’चा तिसरामध्ये सीजनमध्ये प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांनी देखील सहभाग घेतला होता. मात्र त्यांच्या सहभागामुळे समर्थक नाराज झाले असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरातून शिवलीला यांना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे बाहेर पडाव लागलं आहे.
शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आणि बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे व्होटिंग लाईन्स बंद राहणार आहे. त्यामुळे शिवलीला यांच्या तब्येतीत जेव्हा सुधारणा होईल त्यावेळी त्या पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल.
शिवलीला पाटील या मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या कन्या आहेत. शिवलीला पाटील यांची ‘बिग बॉस’मध्ये भक्तीमय वातावरणात एंट्री झाली. मात्र अभिनय क्षेत्रातील कलाकारांव्यतिरिक्त शिवलीला यांनी सहभाग घेतल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लोक नाराज असल्याचे दिसत आहे.
0 Comments