परळी तून धनंजय मुंडे ला पुढील दहा वर्ष कोणी हरवू शकणार नाही


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी परळी येथे बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी ‘पुढील दहा वर्षे धनंजय मुंडे यांना निवडणुकीत कोणीही हरवू शकणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या यात्रेवरून विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. यावेळी परळीकरांचं प्रेम पाहता पुढील दहा वर्षे धनंजय मुंडेंना कोणीच हरवु शकणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

आता पुन्हा कोरोना कमी झाल्यामुळे यात्रा सुरू करण्यात येत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी जयंत पाटलांनी माझ्या लग्नालाही इतके लोक नव्हते, इतके लोक इथे स्वागतासाठी जमले आहेत, असं म्हटलं आहे.

ज्याप्रमाणे बारामती शरद पवारंच्या पाठीमागे उभी राहिली तशीच साथ तुम्ही धनंजय मुंडे यांना द्या, असं म्हटलं आहे. तसेच यावेळी बारामती सारखाचं परळीचा विकास होणार असल्याचं  जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments