वाकडी/प्रतिनिधी:
आज झालेल्या वृक्ष वर्धापन दिनानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले शिक्षण विस्ताराधिकारी श्री खुळे साहेब गट शिक्षण कार्यालय परांडा तसेच बार्शी वृक्ष संवर्धन समितीचे सन्माननीय राणा दादा देशमुख, सुधीर वाघमारे,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक वृंद गुरुवर्य आमचे मार्गदर्शक नलवडे सर, देवराम सर, गलांडे सर, करळे सर तसेच वाकडी ग्रामपंचायतचे सरपंच, सन्माननीय सदस्य गावातील सर्व वृक्ष प्रेमी तरुण मंडळ यांनी उपस्थित राहून वृक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला, त्याबद्दल वृक्ष संवर्धन समिती तर्फे सर्वांचे यावेळी मार्गदर्शन करताना खुळे यांनी वृक्षांचे मानवी जीवनासाठी असलेले फायदे यावेळी सांगितले तसेच त्यांनी सर्व तरुणांची खूप कौतुक केले आणि यापुढे वृक्ष संवर्धनासाठी आपल्याला त्यांच्याकडून मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे जाहीर केले.
त्यानंतर बार्शी वृक्ष संवर्धन समितीचे वाघमारे यांनी सर्व जिल्हा परिषद शिक्षक स्टाफचे खूप खूप अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी प्राथमिक शाळेतील काही मोजकेच विद्यार्थी कोरोना काळामुळे उपस्थित होते. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे वृक्षसंवर्धन समिती, वाकडी आभार मानले आहेत.
0 Comments