कोरोना काळात अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. श्रीमंतापासून सामन्यांपर्यंत अनेकांचे हाल झाले. तर दुसरीकडे बळीराजा देखील संकटात सापडला होता. या काळात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. केंद्र सराकरा आर्थिक कचाट्यात सापडल्यानं काही बँकांच्या व्याजदरात देखील वाढ केली आहे. त्यातच आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पाच लाखांपर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे. बॅकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बॅकेच्या ८3 व्या सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली आहे. याआधी शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची मर्यादा ही ३ लाख इतकी होती.
बँकेचे सभासद असलेल्या लाखो शेतकऱ्यांनी याबाबत मागणी केली होती. त्यामुळे अखेर बँकेने हा निर्णय घेतला आहे. शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी केडीसीसी ही देशातील पहिलीच बँक असल्याचं देखील मुश्रीफ यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, गेल्या ६ वर्षापासून ही बँक तोट्यात होती. या बँकेवर तब्बल १०३ कोटींचं कर्ज होतं. आता हा तोटा भरून काढून बँकेने १४५ कोटींचा नफा कमवला आहे. या बँकेत सध्या ७,१४१ कोटींच्या ठेवी आहेत.
0 Comments