बार्शी - उस्मानाबाद रस्त्याचे काम चालू असून या कामामध्ये रस्त्याच्या कामातील काळी माती उचलून शेजारील शेतात भराव केल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्या मातीच्या भरावातून पाण्याला वाट करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. बार्शी - उस्मानाबाद रस्त्याचे काम सुरु असुन नारी वाडी जवळील घूगे पेट्रोल पंपाजवळ १६२/ ८०० रस्त्याच्या कामातील काळी माती उचलून रस्त्याच्या शेजारील शेतात ठेकेदाराने जेसीबी मशीन व टिप्परच्या साह्याने रोड लगत माती टाकुन भराव केल्यामुळे पुर्वी पासुन पावसाचे वाहते पाणी बंद केल्याने तेथील गट नं १४५,१४६ ,१४७,१४८ मध्ये पाणी साचले असून तेथील शेती व पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूर्वीपासुन पावसाचे पाणी काढून देण्यात यावे अशी या गटातील शेतकऱ्याची मागणी केली आहे. याबाबत बार्शी तहसिल कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार केली आहे. तसेच ठेकेदाराच्या चुकीमुळे आमच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई ठेकेदाराने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.
0 Comments