बार्शीकरांच्या कल्याणासाठी पोलिस प्रशासनाला विश्वासात घेऊन चर्चा करणार : आमदार राजेंद्र राऊत



आमदार राजेंद्र राऊत व पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या खडाजंगी 

बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील भोसले चौक येथील जवाहर गणेश मंडळाने गणेशाची आरती करण्यात आली व त्या ठिकाणी एक जणाचा वाढदिवस साजरा करत असताना बार्शी शहराचे आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते. यावरून आमदार राजेंद्र राऊत व बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मध्ये शाब्दिक चकमक झाली.

(Advertise)

बार्शीत तालिबानी राज्य आहे का...

गणेश मंडळात गणेशाची आरती करण्यात आली असल्याचे म्हणत आमदार राजेंद्र राऊत यांनी पोलीस निरीक्षक शेळके यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्यावर निरीक्षक शेळके म्हणाले आरती करण्यासाठी चार लोकांची परवानगी आहे त्यावेळी राजेंद्र राऊत म्हणाले हे काही तालिबानचे राज्य नाही त्यानंतर पोलिस निरीक्षक शेळके यांनी कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावर बोट ठेवून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यावर जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच गणेश उत्सव साजरा केला जात असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडून सांगण्यात आले याच कारणावरून पोलीस निरीक्षक रामदास शेळके व आमदार राजेंद्र राऊत यांच्या खडाजंगी होताना दिसली. 
(Advertise)

लोकप्रतिनिधी या नात्याने बार्शीमधील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यासाठी, लवकरच नगरपालिकेत प्रशासकीय बैठक घेऊन, पोलीस प्रशासनाशीही बैठकीत चर्चा करणार आहे. यातून नागरिकांच्या हिताच्या अनुषंगाने सुवर्णमध्य काढला जाईल. पोलीस प्रशासनाला सहकार्य असेलच, पण सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होणार नाही, हेही मला पाहावे लागते - आमदार राजेंद्र राऊत

Post a Comment

1 Comments

  1. सर्वसामान्यांचे केक खाऊनही पोट भरणार नाही साहेब

    ReplyDelete