बार्शी शहर पोलीस स्टेशनला किडनीच्या नावाखाली आर्थिक फसवणुक करुन पैसे माघारी मागितले असता श्री. प्रदिप सुतार यांनी शिविगाळ केल्याची तक्रार करुन त्यांचेवर अदखलपाञ गुन्हा नोंद करण्यात आला होता.परंतु सदर गुन्हा घडलेवेळी ते बार्शी शहरात हजरच नव्हते.
त्याबाबत आज दि. ०३/०९/२०२१ रोजी वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. परमेश्वर संदीपान सुतार व नितीन परमेश्वर सुतार रा. बावी ता. वाशी जि. उस्मानाबाद. या उभय बाप लेकांनी पांडुरंग सुतार याचे सांगणेवरुन श्री. प्रदीप सुतार यांनी १,७०,०००/— ची आर्थिक फसवणुक करुन गंडा घातल्याची खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
नितीन सुतार व परमेश्वर सुतार यांचे म्हणण्यानुसार आर्थिक व्यवहारावेळी हजर असणारे बिभीषण सुतार व अभिजीत नाईक यांचेसमक्ष त्यांनी १,७०,०००/— हे प्रदिप सुतार यांना दिल्याचे सांगितले होते. बिभीषण सुतार ( परमेश्वर सुतार यांचे मेहुणे व नितीन सुतार याचे सख्खे मामा) यांना अधिक विचारणा केली असता त्यांनी असा कोणताही आर्थिक व्यवहारच झाला नसल्याचे सांगितले आहे. बिभीषण सुतार, राजेंन्द्र सुतार, अरुण सुतार या सख्या भावांनी प्रत्येकी२५०००/— एकुण ७५,००० व परमेश्वर सुतार यांनी ३०,०००/— असे एकुण सर्व १,०५,०००/— हे पुण्यातील पुढील उपचारासाठी गोळा केले होते . ते पैसे घेऊन श्री.प्रदिप सुतार यांचे घरी गेल्याचे खरे आहे पण त्यांनी ती रक्कम स्वीकारलेली नव्हती. ती रक्कम आजतागायत स्वताकडेच असल्याचे बिभीषण सुतार यांनी सांगितले आहे.
परमेश्वर सुतार यांनी वेळोवेळी घरगुती अडचणी सांगुन ४५ हजार रुपये बिभीषण यांचेकडुन व प्रदीप सुतार यांचेकडुन १५०००/—घेऊन गेल्याचे सांगितले. याबाबतच्या बॅकेत पैसे भरलेली पावती सोबत माहीतीसाठी जोडत आहे.परमेश्वर सुतार यांनी त्यांचे रकमेपेक्षा अधिक रक्कम घरखर्चापोटी लागेल तशी मागणी करीन नेली आहे.बाकी राहिलेली रक्कम ही माझे जबाबदारीवर माझ्या सख्या भावांचे कडुन गोळा केलेली आहे ती रक्कम माझेजवळच आहे. त्यात परमेश्वर सुतार यांचा कसलाही संबंध नाही.
प्रदीप सुतार यांची जाणीवपुर्वक , झारीतील शुक्राचार्यांचे ऐकुन बदनामी करण्याच्या उद्देशानेच खोटया तक्रारीचा बनाव केलेला आहे. या सर्व प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याची शहानिशा करण्यासाठी संबंधित उभय बापलेकांसह पांडुरंग काळे यांचे मोबाईल चे CDR व काॅल डिटेल्स तपासुन निष्कारण प्रदीप सुतार यांची बदनामी केल्याप्रकरणी जबाबदार असणार्या व्यक्तींवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
0 Comments