बार्शी! गुळपोळी सोसायटीतील पिडीत शेतकरी यांनी सहकार मंत्री यांचे कडे केली इच्छा मरणाची मागणी

बार्शी/प्रतिनिधी:
    
गुळपोळी विविध कार्यकारी सेवा  सहकारी संस्था मर्यादित गुळपोळी व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक सोलापूर शाखा कोरफळे या दोन्ही संस्थेतील कर्मचार्यांनी गुळपोळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गुळपोळी या संस्थेतील सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज काढल्याबद्दल व कर्ज खात्यात अपहार केल्याबाबत व सर्व पुरावे देऊन सुध्दा आम्हाला न्याय मिळात नसल्याने पिडीत शेतकरी यांनी सहकार मंत्री यांचे कडे इच्छा मरणाची परवानगी मागीतली आहे.

पिडीत शेतकरी- दत्तात्रय रामभाऊ भोसले अपंग शेतकरी आहे, गोविंद शिवाजी चिकणे वयोवृद्ध शेतकरी, वैजिनाथ दशरथ चिकणे- मयत हा शेतकरी तर मरून गेला पण न्याय मिळाला नाही, अनुसया बापू यादव अशिक्षित शेतकरी महीला आहे, मंगल गोविंद चिकणे वृध्द शेतकरी महीला, शरद वैजिनाथ चिकणे, सुकुमार राजाराम नरखडे, विष्णू रामहरी नरखडे अशिक्षित शेतकरी, निर्मला वैजिनाथ चिकणे, महेश मोहन काळे माळी, या शेतकरी सभासद सह १३१ शेतकरी यांचे कर्ज खात्यात - १) संताजी पांडुरंग वागदरे व २) सतिष उर्फ सदगुरू मच्छींद्र चिकणे हे दोघेच सचिव आहेत आलटून पालटून १९९८ ते २०१७ पर्यन्त व चेअरमण राजाराम आप्पाराव मचाले हे १९९५ ते २०२१ हेच चेअरमण आहेत, चेअरमण यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दोन दोन बैंकेचे कर्ज उचलले आहे.

 तत्कालीन बैंक कर्मचारी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा कोरफळे चे यांनी संगणमताने अपहार केला आहे, म्हणुन आम्ही सहा( ६) वर्षापासून  सहायक निबंधक सहकारी संस्था बार्शी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर, सहकार आयुक्त पुणे,मुख्यमंत्री, सहकार मंत्री, यांचेकडे तकरारी अर्ज केले पोस्टाने, ईमेल द्वारे, परंतु पिडीत शेतकरी यांना न्याय मिळाला नाही म्हणुन दि १२/९/२०२१ रोजी शेतकरी यांचे वतीने सूर्यकांत उर्फ हणूमंत  गोविंद चिकणे व प्रविन तुकाराम डोके, रेखा सूर्यकांत चिकणे यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री (कॅबिनेट मंत्री) याना समक्ष भेटून निवेदन दिले आहे, या निवेदनात म्हटले आहे की आम्हाला न्याय तर द्या अथवा  इच्छा मरणाची परवानगी तर द्या दोन्ही पैकी एकाची परवानगी द्या अन्यथा दि १५/०९/२०२१ पासून सहकार मंत्री बाळासाहे पाटील यांचे घरासमोर कराड येथील, अथवा सहकारी मंत्री बाळासाहे पाटील यांचे मुबंई येथील निवासस्थानासमोर धरणे आदोलनास बसणार आहे आहे असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments