आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली…


भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. तर आज सोन्यासह चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. कमजोर ग्लोबल संकेतांमुळे सोन्याचांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे.

एमसीएक्सवर आज सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी कमी होत 47,406 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.19 घसरणीसह 65,208 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.17 टक्क्यांनी उतरले होते तर चांदी 0.19 टक्क्यांनी महागली होती.

अमेरिकन डॉलरच्या कमजोर समर्थनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,826.75 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदीचे दर 0.4 टक्क्यांनी वाढून 24.76 डॉलर प्रति औंस झाले आहेत. त्याचप्रमाणे प्लॅटिनमच्या दरातही वाढ झाली आहे. प्लॅटिनमचे दर 1,020.26 डॉलर झाले आहेत.


24 कॅरेट सोन्याचा दर

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार देशातील विविध शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा आहे. 7 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये सोन्याचा दर 50910 रुपये प्रति तोळा आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 47530 रुपये तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर अनुक्रमे 49650 रुपये आणि 48850 रुपये प्रति तोळा आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर

तर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold price today) 46660 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईत 22 कॅरेटचा दर 46530 रुपये प्रति तोळा आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये दर अनुक्रमे 46950 रुपये आणि 44780 रुपये प्रति तोळा आहे.

Post a Comment

0 Comments