निंबोळी अर्कचा कीटकनाशक म्हणून वापर केल्याने उत्पादनात निश्चितच वाढ होते : कृषिदूत गणेश घुगे


बार्शी:

शेतकऱ्यांनी परिणामकारक कीटकनाशक म्हणून निंबोळी अर्क कसा वापर करावा. अनेक शेतकरी पिकावरील रोग व किडीचा नायनाट करण्यासाठी महागडी रासायनिक औषधे वापरतात. कमी खर्चिक व पिकाला उपयुक्त निंबोळी अर्क चा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृषी दूत गणेश घुगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. ते श्रीपत पिंपरी येथे प्रात्यक्षिक दरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

कार्यक्रम समन्वयक डॉ.डी. पी.कोरकटर, प्राचार्य.आर.जी.नलवडे,प्रा.एस.आर.आडत,प्रा.डी.एस.मेटकरी,अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिपुरक उपक्रमाची माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments