झिम्बाब्वेचा स्टार क्रिकेटर ब्रेंडन टेलरने आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. ३४ वर्षीय माजी कर्णधार आणि झिम्बाब्वेचा बहुचर्चित क्रिकेटपटू टेलर आज सोमवारी आयर्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. त्याने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि लवकरच तो झिम्बाब्वे संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला.
शून्यासह आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या टेलरकडे २०४ सामन्यांमध्ये ६,६७७ एकदिवसीय धावा आहेत. त्याच्या नावावर ११ एकदिवसीय शतके आणि ३९ अर्धशतके आहेत. त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये २३२० धावा केल्या आहेत, ज्यात सहा शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. टेरलने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची माहिती दिली.
माझे ध्येय नेहमीच संघाला चांगल्या स्थितीत सोडणे होते, कारण जेव्हा मी २००४ मध्ये पहिल्यांदा परत आलो. तेव्हा मी ते केले.” टेलरने २०१५च्या विश्वचषकात झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक धावा केल्या.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज
टेलरची बॅट सर्वाधिक वेळा भारताविरुद्धच तळपली आहे. त्याने भारतीय गोलंदाजांना थकवण्याची एकही संधी सोडली नाही. मे २०१० मध्ये त्याने भारताविरुद्ध ८१ धावा केल्या. त्यानंतर जून २०१० मध्ये भारताविरुद्ध ७४ धावांची खेळी खेळली. त्याने २०१५ मध्ये ऑकलंडमध्ये भारताविरुद्ध १३८ धावा केल्या होत्या.
0 Comments