✒️अर्जुन गोडगे
६० चे दशक होते. भारत देश उभा राहत होता. बार्शी सारख्या ग्रामीण भागामध्ये मोजक्याच लोकांकडे सायकली तसेच मोटारसायकली होत्या. अगदी घराच्या दाराला सायकल असणे म्हणजे प्रतिष्ठेत समजे जाई. या वाहनांन मध्ये काय बिघाड झाला तर दुरुस्तीची पंचायत होई. पण या काळातच सायकल बरोबर मोटरसायकल दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला बार्शीचे अंबादास कोरे यांनी. 'दत्त' गॅरेज म्हणुन त्यांनी या सेवेला सुरवात केली. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ५५ वर्षापूर्वी अंबादास यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यासाठी त्यांच्या तीन पिढ्यांनी योगदान दिले आहे. अंबादास कोरे यांनी हे दत्त गॅरेज चालू केले त्यावेळी बार्शी तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात मोटरसायकल ची संख्या अत्यंत दुर्मिळ होती. त्या काळामध्ये गावच्या सरपंचाकडे किंवा पाटलाकडे एखादी मोटारसायकल असायची. काहीवेळा गॅरेजमध्ये अन्यथा खेडोपाडी जाऊन मोटर सायकल दुरुस्त करण्याचे काम अंबादास कोरे यांनी केले आहे. त्यावेळी दुरुस्तीला किरकोळ पैसे किंवा धान्याच्या स्वरूपात मोबदला दिला जाई.
१९९० च्या दशकात खाजगीकरण - उदारीकरण - जागतिकरण हे धोरण आले. भविष्यातील व्यवसायाची ओळख लक्षात घेऊन त्यांनी सुरू केलेला मोटर सायकल दुरुस्तीचा व्यवसाय वेगाने वाढत होता. मोटरसायकलचे संख्याही वाढली, काळाची पावले ओळखून चालू केलेले 'दत्त' गॅरेज बार्शी तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात नावारूपाला आले.
सध्याच्या धावपळीच्या युगात 'दत्त' गॅरेज ने ग्राहकाच्या पसंतीनुसार मापक व किफायतशीर दरात मोटरसायकल दुरुस्ती जुन्या गाड्या कमिशन बेसिसवर मोटर सायकल व चार चाकी गाड्यांचा कमिशन बेसिसवर खरेदी - विक्रीचा व्यवसाय चालू केला. बार्शी शहरासह सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील मोटर सायकल दुरुस्ती व कमिशन बेसवर खरेदी - विक्री या क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणून दत्त गॅरेज ची ओळख आहे.
मोटर सायकल दुरुस्ती क्षेत्रातील बारीक - सारीक कामांची उत्तम जान,इंजिन कामे व अवरेज वाढविणे म्हणून ग्राहकांचा दत्त गॅरेज कडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. आजच्या पिढीतील त्यांचे नातू हे त्यांचा वारसा चालवत आहेत. बार्शी शहरासह उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यामध्ये नावलौकिक कमावला आहे. स्पर्धेच्या युगामध्ये ५५ वर्षापासून कमावलेला विश्वास आजही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुढे नेण्याचे काम केशव विजय थोरात (कोरे) हे करत आहेत. बार्शी शहरातील अनेक दुचाकी स्वरांचे विश्वासाचे ठिकाण म्हणून 'दत्त' गॅरेज नावलौकिक मिळवला आहे.
संपर्क:
'दत्त' गॅरेज व टू व्हीलर व फोर व्हीलर खरेदी विक्री वर्क शॉप :
श्री. केशव विजय थोरात(कोरे)
मोबाईल: ९४०५७६७३७२
0 Comments