बार्शी ! शेळगाव (आर) च्या सरपंच पदी प्रकाश बादगुडे यांची निवड


बार्शी/प्रतिनिधी:

कोरोणामुळे सरपंच प्रभावती विजय बादगुडे यांचे निधन झाले होते, त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी प्रकाश बानगुडे यांची निवड झाली. 

वसुदेव बापू गायकवाड (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती) व विजय बबलू अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सरपंच पदावर प्रकाश बादगुडे यांची निवड झाली आहे. 

यावेळी जीवन गायकवाड, मायाताई मगर, उद्धव गायकवाड, राजाप्पा गायकवाड, संतोष रेडेकर, भरत सपाटे, शहाजी कटरे, श्याम शिरसकर, आबासाहेब निकम शंकर पाटील, दादा गायकवाड, वासुदेव काका गायकवाड यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने या निवडीवेळी उपस्थित होते ही निवड ग्राम विकास अधिकारी गोपाळ सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Post a Comment

0 Comments