✒️ अविनाश कळकेकर, नांदेड(सोशल मीडियावर साभार)
तुम्ही नांदेड मध्ये आलात त्यामूळे नांदेडकर आज धन्य झाले. किती तरी दिवसानंतर असं वाटलं की आम्हाला जाणणारा नेता आमच्यात आलाय.तुम्ही केलेला आजचा दौरा राज्य सरकार च्या नाकावर टिच्चून पार पाडलात हे बर केलत. तुमचा हा दौरा राज्य सरकारच्या डोळ्यात खुपतोय म्हणून तुमच्या या अचानक काढलेल्या दौऱ्या विषयी गरळ ओकली जात होती. गरळ ओकण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे म्हणा.
पण तात्या तुम्ही हे मात्र चांगलं केलत की राज्य सरकारला त्यांनी स्वतःच्या खर्चातून बांधलेल्या वसतिगृहाचे उदघाटन करायला वेळ न्हवता म्हणून तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या आणि वापरात असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करणार होतात तुम्ही. पण वापरात असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करुन नको ती नामुष्की ओढावून घ्यायच तुमच्या रक्तातच नाही हे कधी कळणार ठाकरे सरकारला? त्यांना तुम्ही हे दाखवून दिलंत की तुम्हाला वेळ नसेल तर हे उद्घाटनाचे काम ' मि ' करेल त्यासाठी भाजपचा(माफ करा महाराष्ट्र राज्याचा) हा राज्यपाल तत्पर आहे! पण नामुष्की ओढवली जाऊ शकते म्हणून हे उद्घाटन टाळतो आहे. आणि हो तात्या, असेही मागच्या काही वर्षात स्वारातीम विद्यापिठात विशेष असा नविन एकही प्रकल्प आला न्हवता म्हणून काहीजण रडतयात त्यांना सांगा की, वसतिगृहाचे उद्ाटन करण्यासाठी आलो होतो हे नविन प्रकल्पापेक्षा काही कमी आहे का म्हणावं !
तात्या, काही महिन्यापूर्वी झालेल्या "नॅक"च्या मूल्यांकनात विद्यापीठाचा दर्जा घसरला होता पण आज तुमच्या विद्यापीठाला झालेल्या पदस्पर्शाने नॅक मधील घसरलेला दर्जा सुधारेल यात तीळ मात्र शंका नाही.कारण, तुमच्या आजच्या येण्याने शहरात खूप काही सुधारना झाली.हेच बघा ना की तुम्ही विमानतळावरून ज्या-ज्या रस्त्याने तुम्ही जाणार होतात त्या-त्या रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले. हे तेच खड्डे होते जे मागच्या काही वर्षापासून सामान्यांचे जीव अडचणीत टाकत होते. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की आमचं सुख दुःख जाणणारा नेता आमच्यात आलाय.
तात्या,तुमच्या येण्याने कितीतरी जणांचे हे दिवस सुगीचे झाले, म्हणजे प्रिंट मीडियातील पत्रकारांना तुमच्या येण्याने का होईना कोरोना टाळून तुमच्यावर बातमी छापता आली, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना बराच वेळ तुमच्या बद्दल चर्चा घडवून आणता आली.आणि आज तुम्ही ११ वाजताच्या दरम्यान शहरात एंट्री केलात त्यामुळे शहरातील लोकांना सिग्नल च्या ठिकाणी थोडा का वेळ होईना तुमच्या मुळे गाडी चालवताना विश्रांती घेता आली.
तात्या काही म्हणा,
तुम्ही आलात आणि शहरात बदल घडला तुमच्या येण्याने एवढे बदल होणार असतील तर तात्या तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बर होत नाही?
तसेही तुम्ही आमच्या मनातले राज्यपाल कमी मुख्यमंत्री च जास्त आहात म्हणा...!
म्हणूनच तर शासकीय विश्रामृहावर तुम्ही आल्यानंतर जत्रेच स्वरूप आल होत.
म्हणूनच तात्या, आमच्या शहरात तुम्ही आलात बदल घडून आला. राज्याच्या इतर शहरात देखील अशाच भेटी गाठी होत राहू द्या निदान त्या भेटीतून रस्त्यावरील खड्डे तरी बुजवले जातील. आणि त्यातून नागरिकांचे जीव तरी वाचतील.
0 Comments