आगामी १५ महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे.
स्थानिक पातळीवर सरकट महाविकास आघाडी होणार नाही, स्थानिक परिस्थितीनुसार कोणासोबत जायचं यावर त्या पक्षासोबत आघाडी केली जाईल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना नवाब मलिक यांनी आगामी महापालिका निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची, याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.
आमची स्पष्ट भूमिका आहे की, स्थानिक परिस्थितीनुसार निवडणुका होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी परिस्थिती नाही. त्यामुळे काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोरासमोर लढत आहे.
तर कुठे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. त्या ठिकाणी दोन पक्षांसोबत आघाडी करायची, तिन्ही पक्षांनी आघाडी करायची किंवा स्वबळावर निवडणूक लढवायची हे स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय होणार आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, पण स्थानिक पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी कोणतीही पक्षाची भूमिका नाही. स्थानिक पातळीवरील नेते जी भूमिका मांडतील, त्यावरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असंही मलिक यांनी स्पष्ट केल.
तसंच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः १४ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या स्थानिक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून कोणाबरोबर आघाडी करावी हे निश्चित केलंय, सरसकट एकच पक्षाबरोबर आघाडी होणार नाही, असंही मलिक म्हणाले.
0 Comments