भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. त्यातच चंद्रकांत पाटलांसह महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत दाखल झाल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
चंद्रकांत पाटील कालपासून दिल्लीत आहेत. आज त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा फक्त मीडियात आहेत. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही.
सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
0 Comments