अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासानं अजून चित्रपटांमध्ये प्रवेश केलेला नसला, तरी तिच्याबद्दल अधिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. न्यासा जेव्हाही तिच्या आई आणि वडिलांसोबत दिसते तेव्हा तिचे फोटो सोशल मीडियावर नक्कीच व्हायरल होतात.
चाहतेही न्यासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तर नुकतंच एका मुलाखतीत काजोलला तिच्या मुलीबद्दल विचारण्यात आलं, यावेळी तिनं अशा प्रकारे उत्तर दिलं की तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
काजोलला विचारण्यात आलं की जर तिला समजलं की मुलगी न्यासाचा एक सिक्रेट बॉयफ्रेंड असेल तर ती काय करेल? काजोलला ही कल्पना थोडी आवडली नाही. तिनं अजयबद्दल विनोद केला. काजोल म्हणाली, ‘अजयला कळलं तर तो गेटवर एक बंदूक घेऊन उभा राहील.’
काजोलला विचारण्यात होतं की न्यासा आणि युग प्रेमाचा सल्ला कोणाकडून घेतील, तुझ्याकडून की अजय? तर काजोल म्हणाली, ‘मला वाटतं की न्यासा माझ्याकडे आणि युग अजयकडे येईल कारण युग म्हणतो की त्याचे वडील खूप कूल आहेत.’
काजोलनं असंही म्हटलं होतं की, न्यासा कधीही तिच्या वडिलांकडे जाणार नाही. ती त्यांना कधीच तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगणार नाही. अन्यथा तो बंदूक घेऊन उभा राहील आणि म्हणेल की तो कोण आहे, तो कोण आहे.
यापूर्वी कॉफी विथ करणमध्ये काजोलनं सांगितलं होतं की अजय एक पजेसिव्ह पिता आहे आणि जोपर्यंत न्यासा सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तो शांत हसत नाही. तो विचारत राहतो की न्यासा कुठे चालली आहे, कधी परत येईल.
0 Comments