सोलापूर! दूध आणायला गेल्यानं नियमाचं उल्लंघन; गुन्हा दाखल झाल्यानंं तरुणाचं भविष्य अंधारात



सोलापूर : राज्यभरात कोरोना काळात नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हजारो व्यक्तींविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आता सर्वसामान्यांना त्रास देखील सहन करावा लागत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या राकेशला इन्फोसिस  सारख्या मोठ्या कंपनी मधून नोकरीची ऑफर आली आहे. दारिद्रय पाचवीला पुजलेलं असताना, देखील मोठ्या कंपनीतून आलेली नोकरीची ऑफर आनंद देणारी होती. मात्र, कोरोना काळात दाखल झालेल्या, एका गुन्ह्यामुळे राकेशच्या नोकरी मिळवण्यात अडचणी निर्माण झाले आहेत.

सोलापुरातील  इंदिरा वसाहत परिसरात राकेश आपल्या आजी सोबत राहत होता. मागच्या वर्षी आजोबांना निमोनिया झालेला आणि आजीला चालता येत नाही. त्यासाठी तो सकाळी चहासाठी दुध आणायला राकेश घराबाहेर पडला होता. दुधाची पिशवी घेतली, घराकडे येत असतानाच पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना विनवण्या केले होते. मात्र, एका शब्दाने ही पोलिसांनी त्याचे ऐकलं नाही.

केवळ गुन्हेच नाहीच तर मास्क न वापरलेल्या लोकांना १ कोटी ९६ लाखांचा दंड देखील सोलापूर पोलिसांनी केला आहे. शैक्षणिक दाखले, पासपोर्ट , नोकरीच्या ठिकाणी अनेकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. मात्र, कलम १८८ नुसार गुन्हे दाखल असल्याने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढताना अडचणी निर्माण होत आहेत. राजकीय किंवा सामाजिक आंदोलने करत असताना, दाखल झालेले किरकोळ गुन्हे राज्यशासनाच्या आदेशानुसार काही वर्षांनी रद्द केले जातात.

Post a Comment

0 Comments