उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये एक अजब घटना घडली आहे. एका आईने स्वतःच्याच लेकीचा संसार मोडला असल्याचं समोर आलं आहे. सासू आणि जावई या दोघांना एकमेकांवर प्रेम जडलं असून त्यानंतर या दोघांनी जे केलं ते पाहून कोणालाही धक्का बसेल.
भौराकाल क्षेत्रातील गावात एक महिलेने आपली मुलीचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या काही महिन्यानंतर संबंधित महिला आपल्या २५ वर्षांच्या जावयाच्या प्रेमात पडली. एवढंच नाही तर जावयाला देखील आपल्या पत्नीवर सोडून सासूवर प्रेम जडले. संबंधित महिला ही ५० वर्षांची आहे. यानंतर सासू आणि जावयाने तिथून पळ काढला.
सासू आणि जावयानं दोघांनी मिळून १० महिन्यानंतर लग्नगाठ बांधली. लग्न केल्यानंतर दोघेही घरी परतले. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. मात्र तरी देखील हे जोडपं मागं सरकलं नाही. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. यावेळी आम्ही दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत असून आम्हाला एकत्र राहयचं असल्याची इच्छा या दोघांनी पोलिसांसमोर व्यक्त केली.
दरम्यान, या संपुर्ण प्रकरणांनंतर नातेवाईकांनी देखील हार मानली. तसेच कुटुंबियांनी त्यांच्यासोबत असलेले सर्व नातं तोडलं आहे. मात्र सासू आणि जावई आनंदात असून दोघे आपला संसार करत आहेत. या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
1 Comments
यामुळे तर सगळी दुनिया कोरोना सारख्या रोगाने त्रस्त झाले आहे
ReplyDelete