प्रियांकाच्या चोप्राच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची तब्बल एवढी किंमत



बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. बाॅलिवूडच नव्हे तर हाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रियांका सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियांकानं काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत भारतीय रेस्टॉरंट सुरु केलं. तिच्या या रेस्टॉरंटचे नाव ‘सोना’ असून या रेस्टॉरंटमध्ये भारतातील लोकप्रिय पदार्थांची चव चाखायला मिळत असते. अशातच या रेस्टॉरंटमधील एका मेन्यूचा सगळीकडेच बोलबाला होताना दिसत आहे. हा पदार्थ म्हणजे ‘मुंबईचा वडापाव’.

‘मुंबईचा वडापाव’ म्हटलं की एक जिव्हाळ्याचा पदार्थ. वडापावचं नाव जरी काढलं तरी कोणाच्याही तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता याच वडापावची न्यूयॉर्कमधील किंमत ऐकून तुमच्या तोंडचं पाणी पळून गेल्याशिवाय राहणार नाही. प्रियांकाच्या न्यूयाॅर्कमधील या रेस्टॉरंटमध्ये एक वडापावची किंमत ही १४ युएस डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात जवळपास एक हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे मुंबईकरांचा लोकप्रिय वडापाव आता न्यूयॉर्कमध्येही आपला जलवा दाखवतोय, असं म्हणायला काही हरकत नाही.

Post a Comment

0 Comments