बार्शी! पानगाव मध्ये छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


बार्शी/प्रतिनिधी:

पानगाव ता.२२ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित  आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS)यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी,पालक,आणि शिक्षकांचा छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.

एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेची गुणवत्तायादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.या परीक्षेत एकूण ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, यापैकी ५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत यावेळीही विद्यालयाने चांगले यश संपादन केले आहे.पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणत संस्थेत तालुक्यात अव्वल येण्याचा मानदेखील या विद्यालयाने मिळवला आहे.सिद्धी बालाजी पवार,श्रुती सतिश काळे,साक्षी बालाजी कानगुडे,साक्षी तुकाराम सगरे,समृद्धी प्रसाद पाटील या विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा,पालकांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान छत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पिंटू नाईकवाडी,समाधान नलवडे,मुख्याध्यापक प्रदीप पाटील,सतीश काळे,शिवाजी कानगुडे,स्वप्निल मोरे,बाळासाहेब खंदारे  यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्याचा मनोदय याप्रसंगी नाईकवाडी यांनी व्यक्त केला.गुणवंतांच्या वतीने सिद्धी पवार हिने कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले तर आभार अमोल महाले यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments