भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आल्यास शिवसेना भवन फोडू, असं वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला आहे.
शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा थेट इशाराच संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना दिला आहे.
शिवसेना भवनाकडे ज्यांनी वाकड्या नजरेनं पाहिले ते वरळीच्या गटारात वाहून कायमचे नामशेष झाले, असं आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेना भवन मराठी माणसांच्या अस्मितेचं प्रतीक, असल्याचं संजय राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे. बोला, येताय अंगावर? असा थेट सवाल भाजपला करण्यात आला आहे.
0 Comments