बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे फातिमा झाली ट्रोल


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री फातिमा सना शेख ही काही दिवसांपूर्वी आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटामुळे चर्चेत आली होती. फातिमा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत फातिमा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच फातिमाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फातिमाने निळ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. या फोटोंमध्ये  फातिमा बोल्ड अंदाजात दिसत आहे. फातिमाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव होत आहे.
मात्र, काही नेटकऱ्यांनी फातिमाला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आमिरचे पूर्ण लक्ष हे तुझ्यावर आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हिला कोणीतरी तुरुंगातून बाहेर काढा एवढ्या सुंदर महिलेला इतका त्रास का देतात.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठी खुले आहेत.’
दरम्यान, ‘दंगल’ या चित्रपटातून फातिमाला खरी लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात फातिमाने गीता फोगाटची भूमिका साकारली होती. 
‘दंगल’ चित्रपटात आमिर आणि फातिमा यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर फातिमाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. काही दिवसांपूर्वी फातिमाचा ‘लुडो’, ‘सूरज पे मंगल भारी’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.

Post a Comment

0 Comments