मोठी बातमी:छगळ भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; ओबीसी आरक्षणप्रकरणी केली एक तास चर्चा


ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भुजबळांनी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन ही भेट घेतली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. यावेळी भुजबळ यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण प्रकरणी चर्चा केली. यावेळी माजी समीर भुजबळदेखील उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचे नेतृत्व करत केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डाटा मागावा अशी असे राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांनी सांगितले होते. या भेटीसंदर्भांत भुजबळ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आरक्षण
सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या निकालामुळे ओबीसींचे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक या मुद्द्यांवरुन आमने सामने आले आहे.

Post a Comment

0 Comments