परांडातील बाल विकासप्रकल्प अधिकारी लाच घेताना रंगहाथ पकडला ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



परंडा:

 परंडा तालुक्यातील अंगणवाडी करिता एकूण ८६ गॅस कनेक्शन पुरवण्याचे काम  देण्यासाठी चाळीस हजार  रुपयांची लाच  रक्कम स्विकारल्याने बाल विकास प्रकल्प अधिकारी नारायण  गायके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी ताब्यात घेतले आहे. 

 तक्रारदार यांची भारत गॅस एजन्सी असून त्यांना आरोपी लोकसेवक श्री नारायण दशरथ गायके, वय ३२ वर्ष, पद बाल विकास प्रकल्प अधिकारी परांडा, यांनी शासनाचा योजनेद्वारे परंडा तालुक्यातील अंगणवाडी करिता एकूण ८६ गॅस कनेक्शन पुरवण्याचे काम दिले होते. त्या ८६ गॅस कनेक्शन चे प्रति कनेक्शन ६५६३.५० पैसे असे एकूण ५,६४,४६१/- रुपया चे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून प्रति कनेक्शन ५६३ रुपये ५० पैसे असे ८६ कनेक्शनची एकूण ४८ हजार ४६१ रुपये ची मागणी करून तडजोड अंती ४०,०००/- रुपये मागणी करून ४०,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने ताब्यात घेऊन त्यांची विरुद्ध परांडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही  पोलीस अधीक्षक राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडित  ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे  , पोलीस निरीक्षक,  ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments