गोड बोलून साडी नेसायला देत महिलेसोबत संतापजनक कृत्य


एका खाजगी कार्यालयाच्या मालकाला भेटण्यासाठी गेलं असता, संबंधित कार्यालयात काम करणाऱ्या महिलेशी ओळख करून तिचे अश्लील फोटो काढल्याचा संतापजनक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

आरोपी पीडित महिलेला एक नवीन साडी भेट दिली आणि ती साडी नेसण्याचा आग्रह केला. दरम्यान पीडित महिला साडी नेसत असताना आरोपीनं तिचे अश्लील फोटो काढले आहेत. अश्लील फोटो काढण्यास विरोध केला असता, आरोपीनं संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय पीडित महिला येरवडा परिसरातील रहिवासी असून ती एका खाजगी कार्यालयात नोकरी करते. दरम्यान एकेदिवशी आरोपी कदम संबंधित कार्यालयाच्या साहेबांना भेटायला आला होता. पण कोरोनामुळे तुम्हाला साहेबांना भेटता येणार नाही, अशी माहिती पीडित महिलेनं दिली. याच संभाषणातून आरोपीनं पीडितेची ओळख काढून गप्पा मारल्या आणि तिचा मोबाइल नंबर घेतला.

हे प्रकरण एवढ्यावरचं थांबलं नाही. तर पीडित महिला काम संपवून घरी जात असताना, आरोपीनं तिला आडवलं. तसेच तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, असं सांगत तिला बळजबरीनं गाडीत बसवलं. यानंतर आरोपीने पीडितेला पुणे स्टेशन परिसरातील होमलँड लॉजमध्ये नेलं.

याठिकाणी आरोपीनं पीडितेला जबरदस्तीनं पैसे देऊ केले. पण पीडितेनं पैसे घ्यायला नकार दिला. पैसे घ्यायला नकार दिल्यानं आरोपीनं तिला नवीन साडी भेट म्हणून दिली आणि संबंधित साडी नेसण्यासाठी आग्रह केला.

दरम्यान पीडित महिला साडी नेसत असताना, आरोपीनं तिचे अश्लील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. यानंतर आरोपीनं पीडितेला अंगावरील सर्व कपडे काढायला सांगत, त्याचेही फोटो काढायला सुरुवात केली.

पण पीडितेनं फोटो काढू देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या आरोपीनं संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपी कदम विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments