भाजप आमदारानं माझ्या थोबाडीत मारली


भाजप आमदारानं माझ्या थोबाडीत मारली
सध्या उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हतबल होऊन आपल्या वरिष्ठांकडे तक्रार करत आहे. या व्हिडिओत संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं भाजपच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांनं आपल्याला थोबाडीत मारल्याचं सांगितलं. तसंच हिंसा भडकवण्यासाठी बॉम्ब आणल्याचं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगत आहे.

पोलीस अधिक्षक प्रशांत कुमार यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत कुमार व्हिडिओत, मुझे भी थप्पड़ मारा” “ये बम भी ले कर आए हैं , बीजेपी वाले, विधायक और ज़िलाध्यक्ष” असं बोलत आहेत.

या व्हिडिओ ईटवाह जिल्ह्यातील आहे. तसंच या व्हिडिओनंतर योगी सरकार या घटनेतील आरोपींवर कारवाई करेल का असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments