बार्शी! माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचे ऑफिस फोडण्याचा प्रयत्न


बार्शी/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्हा मधील बार्शी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचे शनिवारी रात्री ऑफिस फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे .याबाबत बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे गुर नंबर ३१७/ २०२१ ने गुन्हा दाखल झालेला आहे
          
यात सविस्तर हकीकत अशी की,  बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर हे शनिवार दिनांक १० जुलै २०१९ रोजी ऑफिस/ दुकान बंद करून अंदाजे दहाच्या दरम्यान घरी गेले .त्यानंतर ते रविवारी ११ जुलै २०२१ सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान ऑफिस कडे आले. त्यावेळी त्यांना ऑफिसचा मुख्य दरवाजा हा उचकटलेला,  तोडलेला व त्यातील काही लाकडी भाग हा तुटून खाली पडलेला दिसला . त्यानंतर त्यांनी कोणत्याही वस्तूला हात न लावता तात्काळ बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना फोन करून फोनवरून हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष  भेट दिली आणि पंचनामा केला व दीनानाथ काटकर यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर ३१७/ २०२१ ने गुन्हा दाखल केला. याबाबत दीनानाथ काटकर यांनी असे सांगितले की माझे अनेक महत्त्वाचे कागदपत्रे ,मौल्यवान वस्तू या ऑफिसमध्ये असतात, अनेक सामाजिक विषय मी हाताळत आहे. माहिती अधिकारात आलेल्या माहित्या देखील ऑफिसमध्ये असतात.
        
सध्या काटकर हे काही सामाजिक प्रकरणे व काही महत्वाची प्रकरणे हाताळत आहेत तसेच अनेक प्रकरणांची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे तर काही न्यायप्रविष्ट आहेत, तसेच काही प्रकरणे  कोर्टात जाण्याच्या मार्गावर आहेत असे असताना असा प्रकार घडल्याने बार्शीकर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे अधिक तपास पोलीस हवालदार महेश दत्तात्रय मुंडे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments