मंगळवेढा ! गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेंपोवर कारवाई; १६ लाखाचा मुद्देमाल जप्त



येथील पोलिसांनी अवैधपणे गुटख्याची तस्करी करणाऱ्या टेंपोवर धडाकेबाज कारवाई केली आहे. अवैधरित्या टेंपोमधून “कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे इचलकरंजी (जि.कोल्हापूर) कडे जाणारा १६ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी आज पहाटे ५ वाजता पकडला.

या संदर्भात वाहनचालक फजल सरदार मोमीन (वय ३०) व त्याचा जोडीदार अमोल आप्पासाो शिंदे (वय २०) दोघे (रा.इचलकरंजी), राजेश पांडव (हातकणंगले), बाबासाो आण्णा कांबळे वाहनमालक (रा.गोंदवले जि.सातारा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील चडचणहून दि. २ च्या पहाटे ४ वाजता एका टेंपोत अवैधरित्या गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस नाईक अभिजीत साळुंखे,वाहनचालक वाघमारे यांच्या मदतीने मंगळवेढा शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ सापळा लावला असता पहाटे 5 वाजता ( गाडी क्र. एम एच ११ बी एल ३३५८) हा टेंपो मंगळवेढयाच्या दिशेने येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

यावेळी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी टेंपो चालकास इशारा करून तो थांबविला. गाडीच्या चालकाचे नाव विचारले असता फजल मोमिन व त्याचा जोडीदार अमर शिंदे अशी नावे सांगण्यात आली, पोलिस अधिकार्‍यांनी टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये मिनरल पाण्याचे बॉक्स एक लाईन व त्या पाठीमागे खाकी रंगाच्या बॉक्समध्ये आर एम डी गुटखा ठेवल्याचे निदर्शनास आले.

यामध्ये आर एम डी पान मसाला १००० पाकिटे आणि सुगंधी तंबाखू १००० पाकिटे असा १० लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी टेंपोसह १६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा गुटखा हा राजेश पांडव (रा.हातकणंगले) यांच्या सांगणेवरून घेवून जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

Post a Comment

0 Comments