विराट कोहली ठरला इंस्टाग्रामद्वारे सर्वाधिक कमाई करणारा भारतीय...



 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सला पाहून याचा अंदाज येऊ शकतो.

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराटचे १३ कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मिडिया कमाईच्या बाबतीतही तो भारतीयांमध्ये अव्वल ठरला आहे.शेड्यूलिंग टूल च्या इन्स्टाग्राम रिचलिस्ट २०२१ मधून हे समोर आले आहे. 

या यादीनुसार विराट इन्स्टाग्रामवरील एका स्पॉन्सर्ड पोस्टद्वारे ५ कोटींची कमाई करतो. दोन वर्षांपूर्वी त्यांना एका पोस्टसाठी त्याला सुमारे १.३५ कोटी रुपये मिळायचे.म्हणजेच, केवळ दोन वर्षांत एका इन्स्टाग्राम पोस्टबाबतची त्याची कमाई तीन पटीने वाढली आहे.

Post a Comment

0 Comments