सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपीने बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार केला आहे.या तरुणीची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती.

या मैत्रीचा फायदा उचलत त्याने पीडितेला वाढदिवसाच्या बहाण्याने बोलवले आणि बलात्कार केला. हि तरुणी दिल्लीची रहिवासी आहे तर आरोपी हरियाणामधील सोनीपतचा रहिवासी आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून या आरोपीची आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती.

आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या बहाण्याने तरुणीला एका हॉटेलमध्ये बोलावले. हि तरुणी तिथे आल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने अनेकदा विरोध केला पण आरोपीने तिचे काहीही ऐकले नाही. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments