मंगळवेढा/प्रतिनिधी : तालुक्यातील मरवडे येथील वडिलोपार्जित शेतजमीनीमध्ये पेरणीकरिता वापसा आला आहे का? हे पाहण्यासाठी गेलेल्या दिवंगत माजी जिल्हाधिकारी विजय पवार यांचा मुलगा गौरव विजयकुमार पवार (वय २६ रा.सोलापूर ) मुळगाव मरवडे यास चुलती व चुलतबंधूने मारहाण व शिवीगाळ करत विनयभंगाची खोटी केस दाखल करून भविष्य अंधकारमय करण्याची धमकी दिल्याप्रकरणी संजीवनी भारत पवार व अक्षय भारत पवार या आई व मुलाविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौरव विजयकुमार पवार हे असून घटना दि.३ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी , फिर्यादी गौरव विजयकुमार पवारचे वडील दिवंगत जिल्हाधिकारी विजय पवार यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून आजोबांच्या नावावर असलेली मरवडे येथील शेतजमीन गट क्रमांक ६६ ही पेरणी करण्यासाठी वापसा आला आहे का? हे पाहण्यासाठी चुलत बंधू अँड.शिरीष राजाराम पवार यांच्याबरोबर गेल्यानंतर,
सदर शेतजमिनीमध्ये चुलती संजीवनी भारत पवार व चुलत भाऊ अक्षय भारत पवार हे ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करत होते, त्यावेळी फिर्यादी गौरव पवार याने त्यांना आमच्या वहीवाटीची शेताची पट्टी आहे, तुम्ही येथे का पेरणी करीत आहात असे विचारला असता येथे यायचे नाही, असे म्हणून तू , या शेतात आला तर तुझ्यावरती खोटी विनयभंगाची केस करून तुझे पुढील भविष्य खराब करीन , अशी धमकी दिली.
0 Comments