एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह इतरावर गुन्हे दाखल करा ; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.



औरंगाबाद: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह इतर समाजकंटक त्यांचे सहकारी यांचेवर  गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वच लोकप्रतिनिधी, अधिकारी, आपण स्वत:, तसेच इतर कर्मचारी जीवाचे राण करत आहे़ त्यात डेल्टा प्लसची तिसरी लाट भविष्यात उसळण्याची शक्यता वर्तवली जात असताना, राज्य शासनाच्या आदेशावरुन संभाजीनगर जिल्ह्यात लावण्यात आलेल्या विकएंड लॉकडाऊन मध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून ``शान-ए-इम्तियाज'' हा कव्वालीचा कार्यक्रम दौलताबाद परिसरात शनिवार, ३ जुलै २०२१ रोजी आयोजित केला व त्यात त्यांच्या काही समाजकंटकांनी हिंदुस्थानचे चलन असलेल्या पैशाची नोटांची उधळन करुन मध्यरात्री पर्यंत कार्यक्रम करुन नियमाची पायमल्ली केली, ही बाब अत्यंत गंभीर आहे़. लोकप्रतिनिधी असलेले खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून नियमांना केराची टोेपली दाखविली आहे़. खासदार इम्तियाज जलील व त्या ठिकाणी जमलेल्या समाजकंटकांवर त्वरीत गुंन्हे दाखल करण्यात यावे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन काळात वेळोवेळी कायदे मोडले आहेत. दिनांक ३ जुलेै २०२१ रोजी दौलताबाद जवळील अंबर फार्म हाऊस हि जागा कोणाच्या मालकीची आहे, त्याची महसूल विभागाकडून माहिती घेण्यात यावी, व या जागेचे मालक यांचेवर सुध्दा कार्यवाही करण्यात यावी. 

तसेच इम्तियाज जलील यांनी आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी कायदा व सुव्यवस्था मोडलेली असतांना त्यांचेवर अनेक गुन्हे पोलीस विभागाने दाखल केलेले आहेत, याची संपूर्ण माहिती, आपण गृह मंत्रालय, महाराष्ट्र शासनास देण्यात यावी अशी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे़. ३ जुलै २०२१ रोजी सायंकाळी याच भागातून काही वारकऱ्याचे मला फोन आले आणि त्यांनी माझेशी संपर्क करुन त्यांना पोलीसांनी पायी दिंडीने दौलताबादकडून पंढरपूर च्या दिशेने जात असतांना त्यांना देवदर्शनाला जाऊ दिले नाही. व मज्जाव केला व त्यांना परवानगी दिली नाही, परंतू यांना कशी परवानगी दिली. असे त्यांचे म्हणणे होते. वारकऱ्यावर अन्याय व इम्तियाज जलील व त्यांचे सहकारी व समाजकंटकांना कार्यक्रम व धिंगाणा करण्याची मुभा असा भेदभाव का? हा प्रश्न आम्हा सर्वांना पडतो, असे निवेदनात म्हंटले आहे. 

पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे, महापौर नंदकुमार घोडेले,उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments