बार्शी/प्रतिनिधी:
कोरोना परिस्थितीमुळे महात्मा फुले भाजी मंडई येथील भाजी विक्री ठिकाण बंद करण्यात आले होते. परिणामी महात्मा फुले भाजी मंडई परिसरातील आशा टॉकीज रोड, प्रसन्नदाता मार्ग ,खानापूर रोड ,भोगेश्वरी मंदिर परिसर, भीमनगर परिसर ,बाळेश्वरी नाका या सर्व परिसरात नियमितपणे सर्व भाजीविक्रेते रस्त्यावर दोन्ही बाजूला बसून भाजी विक्री करीत आहेत.
परिणामी या संपूर्ण परिसरातील रहिवासी, व्यवसायिक यांची मोठी अडचण, गैरसोय निर्माण झाली असून तसेच या संपूर्ण परिसरात रस्त्यावरील भाजी विक्रीमुळे वाहतुकीसही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
सद्यस्थितीत सर्वत्र अनलॉक असताना बार्शी शहरात मात्र भाजीमंडई च्या बाबतीत प्रशासन योग्य तो निर्णय घेत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उलट या ठिकाणी होणारी मोठया प्रमाणा तील गर्दी , सोशल डिस्टनसिंग चा उडालेला बोजवारा या मुळे अधिक चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवर लोकांची अडचण गैरसोय टाळण्यासाठी तसेच भाजी मंडई परिसरातील नागरिकांची होणारी अडचण दूर करण्यासाठी महात्मा फुले भाजी मंडई स्थित कट्ट्यांवर पूर्ववत नियमांचे पालन करून भाजीमंडई सुरू करावी अशी मागणी अक्कलकोटे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली..
0 Comments