कोल्हापूर:
अलीकडेच करोना रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच १५ ऑगस्ट पर्यंत रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव 'एमपीएससी'कडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कोरोनामुळे बराच काळ रखडलेली संयुक्त पूर्व परीक्षा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत योग्य सराव मिळावा यासाठी 'मंझील ॲकॅडमी' तर्फे निःशुल्क टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. या टेस्ट सिरीजसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना १ ऑगस्ट पासून दर रविवारी त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर या टेस्ट पाठविण्यात येतील. या सेवेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 9595171742 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन 'मंझील ॲकॅडमी'चे संचालक अमोल खोत यांनी केले आहे.
1 Comments
Hii
ReplyDelete