अबब ! कोल्हापुरच्या वीज ग्राहकांनी थकवली ३८८ कोटींची थकबाकी...



संदीप पाटील / कोल्हापूर

केंद्र सरकारने कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती बद्दल राज्य सरकारला पॅकेज जाहीर केले होते परंतु सदर चे पॅकेज केवळ खाजगी वीज कंपन्यांची देयके अदा करण्याच्या अटीवर दिलेले कर्जाऊ रक्कम होती त्यामुळे खाजगी कंपन्यांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळाला पण सरकारी वीज निर्मिती कंपनीची देयके अदा न केल्याने महानिर्मिती कंपनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे या कंपन्यांना कोळसा खरेदीसाठीही पैसे नाही,कर्मचारी यांची देयके अदा करणे अशक्य झाले आहे. वीज देयके वसूल न झाल्याने सरकारी कंपनी असलेल्या महावितरण सोबतच महानिर्मिती व पारेषण या कंपन्या देखील आर्थिक अडचणीत आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूर सर्कल अंतर्गत सहा विभाग असून त्यापैकी ग्रामीण विभाग दोन कडे 1 लाख 20 हजार 287 ग्राहकांचे 104 कोटी 12 लाख इतकी थकबाकी असून त्यानंतर ग्रामीण विभाग एक कडे 1 लाख 19 हजार 632 ग्राहकांकडे आज 78 कोटी 48 लाख, जयसिंगपूर विभागाकडे 93 हजार 488 ग्राहकाकडे 69 कोटी 73 लाख, इचलकरंजी विभागाकडे 59 हजार 355 ग्राहकांकडे 62 कोटी 64 लाख, गडहिंग्लज विभागाकडे 64 हजार 684 ग्राहकाकडे 38 कोटी 66 लाख, कोल्हापूर शहर विभागाकडे सर्वात कमी म्हणजेच 76 हजार 524 ग्राहकांकडे 34 कोटी 78 लाख इतकी थकबाकी आज अखेर प्रलंबित आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता 5 लाख 33 हजार 970 ग्राहकांकडे 388 कोटी 44 लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. वरील आकडेवारी पाहता ग्राहकांचा कल वीज बिलाची थकबाकी भरण्याकडे दिसून येत नाही.

महावितरणने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली असून सुरुवातीला 10 हजार रुपयांच्या वर थकबाकीदार ग्राहकांना मोबाईल द्वारे एस एम एस द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून महावितरणचे कर्मचारी संपर्क साधून वीज बिल भरणा करण्याची विनंती करीत आहेत पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही व्हाट्सअपच्या माध्यमातून कंपनी निरनिराळ्या संदेशा मार्फत ग्राहकांना विनवणी करण्याचे प्रयत्न करत आहे. सुरुवातीला महावितरणमधील कर्मचारी संघटनांनी वीज बिल वसुली ला विरोध केला होता. पण भविष्याचा विचार करता कंपनी टिकवण्यासाठी कामगार संघटनांनी पुढाकार घेतला असून तेही वसुली कामाला लागलेले दिसून येत आहेत.

महावितरण कंपनी कडे असलेल्या ग्राहकांपैकी शेतीपंप ग्राहकांसाठी 2022 पर्यंत शासनाने थकबाकी भरण्याची योजना आणली आहे पण त्याकडे शेतकऱ्यांनी फारसे लक्ष दिलेले दिसून येत नाही 70 हजार 71 शेतकरी ग्राहकांकडे 47 कोटी 56 लाख थकबाकी आहे . पाणीपुरवठा, दिवाबत्ती हे ग्राहक शासनाच्या अनुदानावर अवलंबून असल्याने ही थकबाकी वाढतच चाललेली आहे, एकूण थकबाकी पैकी या ग्राहकांकडे असलेली थकबाकी पाहता 5 हजार 357 ग्राहकांकडे 151कोटी 83 लाख इतकी थकबाकी आहे. तर घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांपैकी 4 लाख 52 हजार 884 ग्राहकांकडे 184 कोटी 23 लाख इतकी थकबाकी आहे .त्याप्रमाणे शासनाचे वीज कनेक्शन असलेले 3699 ग्राहकांकडे 2 कोटी 87 लाख इतकी थकबाकी प्रलंबित आहे या वर्गवारी इतर वर्गवारी असलेले 1959 ग्राहकांकडे 1 कोटी 94 लाख इतकी थकबाकी आहे. ग्राहकांनी वीज बिलाची रक्कम हप्ता हप्त्याने का असेना पण भरणा करावी याकरिता महावितरण प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यानंतरही ग्राहकाने बिल भरले नाहीत तर महावितरण ला कोरोना काळातही वीज कनेक्शन कापण्या सारखा कटू निर्णय घ्यावा लागेल असे दिसते

वीज बिले भरण्याचे वर्कस फेडरेशने ग्राहकांना केले आवाहन....

कोरोना काळात महावितरणने वीजग्राहकांना अखंडित सेवा दिलेली आहे. जयाप्रमाणे मोबाईल बिले इंटरनेट ची बिले केबलची बिले विनातक्रार आपण वेळेवर भरतो तशीच महावितरणने आपल्याला रीडिंग प्रमाणेच म्हणजेच आपल्या वापरा प्रमाणे दिलेली बिले वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संयुक्त सचिव कॉम्रेड सागर मळगे यांनी केले आहे.

Post a Comment

1 Comments